कोल्हापूर (प्रतिनिधी) : पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी गाठली असताना तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा आज (सोमवार) वाढ केली आहे. चार दिवसांपूर्वी गॅसच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ झाली असताना आज २५ रुपयांची वाढ केली आहे. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत.    

याआधी २५ फेब्रुवारी रोजी गॅसच्या दरात २५ रुपयांनी वाढ झाली होती. तसेच, ४ फेब्रुवारीला २५ रुपयांची वाढ झाली होती. तर १४ फेब्रुवारीला ५० रुपयांनी दर वाढले होते. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीचे दर बदलतात. जानेवारी महिन्यात गॅसच्या दरात वाढ केली नव्हती. पण फेब्रुवारीमध्येच एलपीजी गॅसच्या किंमती जवळपास १०० रुपयांनी वाढल्या आहेत. तर, डिसेंबर महिन्यात वाढलेल्या दरांमुळे साधारण एकूण २०० रुपयांनी गॅस महाग झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसणार आहेत.