गारगोटी (प्रतिनिधी) : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात आज (मंगळवार) गारगोटीसह भुदरगड तालुक्यात घरगुती गणेशाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गारगोटी ग्रामपंचायतीने राबवलेल्या मूर्तीदान उपक्रमास सलग दुसऱ्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि गणेश मूर्ती नदीत विसर्जन न करता पर्यावरण वाचवण्यासाठी गारगोटी ग्रामपंचायतीने गेल्या वर्षीपासून मूर्तीदान उपक्रम राबविला आहे. गणेशमूर्ती आणि निर्माल्य विसर्जनासाठी ग्रामपंचायतीने जलकुंड तयार केले असून ग्रामपंचायत आपल्या दारी या उपक्रमांतर्गत प्रत्येक प्रभागात ट्रॅक्टर आणि कर्मचारी पाठवले होते.  त्यामुळे मूर्तीदान उपक्रमाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने मिरवणुकीवर बंदी घातली आङे.  त्यामुळे नागरीकांनी प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले. त्यामुळे गारगोटीसह भुदरगड तालुक्यात एकही विसर्जन मिरवणूक निघाली नाही.