गणपतीपुळे येथील गणपती मंदिर मंगळवारी बंद..!  

0
199

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील गणपती मंदिर मंगळवारी (दि.२) दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांनी घेतला आहे, अशी माहिती संस्थानचे प्रमुख आणि सरपंच डॉ.विवेक भिडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

गणपतीपुळे येथे श्री गणपतीच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी होत असते. मंगळवारी सुमारे दीड वर्षांने अंगारकी संकष्टी चतुर्थी येत आहे. यादिवशी गणपती मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच अंगारकी संकष्टीनिमित्त होणारी यात्राही रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. तरी सर्व गणेशभक्तांनी, ग्रामस्थांनी आणि व्यावसायिकांनी देवस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. भिडे यांनी केले आहे.