टोप (प्रतिनिधी) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर समुह संसर्ग होवू नये. यामुळे कोणतेही सण मोठ्या स्वरुपात करणे खुप धोक्याचे ठरु शकतात. त्यामुळे प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. असे आवाहन शिरोली पोलिस ठाण्याचे सपोनि. राजेश खांडवे यांनी केले. ते आज (सोमवार) शिरोली-नागांव इथल्या घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते.

यावेळी सपोनि. राजेश खांडवे यांनी, कोरोनाचा धोका कायम असुन सर्वानी काळजी घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे मंडळांनी काटेकोरपणे पालन करावे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे, नागावचे सरपंच अरुण माळी, सुरेश यादव, अनिल कांबळे,  महेश चव्हाण, सतिश पाटील, आशानंद मिठारी, ग्रामविकास अधिकारी पी. व्ही. भोगम, प्रकाश कौदाडे, पोलिस पाटील बाबासो पाटील, पोलिस निलेश कांबळे, ग्रा.पं. सदस्य, मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.