कोल्हापूर (प्रतिनिधी) : संस्थेच्या जमिनीचे शासकीय मुल्यांकन करून दाखल देण्याकरिता सहायक नगरचनाकार गणेश माने याला २० लाखांची लाच घेताना लाचप्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली होती. या प्रकरणी आज (शनिवार) विशेष न्यायालयासमोर हजर केले असता माने याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

संस्थेच्या जमिनीचे शासकीय मुल्यांकन करून दाखल देण्याकरिता माने यांने तक्रारदाराकडे ४५ लाख रूपयांची मागणी केली होती. परंतु तडजोड करून पहिल्या टप्प्यात २० लाख रूपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारातील चहाच्या टपरीवर तक्रारदार २० लाख रूपये घेऊन आला होता. यावेळी लाच घेताना माने याला लाचलुचतपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकऱणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. माने याला न्यायालयासमोर आज हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.