गुरुनानक जयंतीनिमित्त उद्या गांधीनगर बाजारपेठ बंद…

0
91

करवीर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गांधीनगर येथे गुरुनानक जयंती विविध उपक्रमाने साजरी केली जाते. त्यामुळे उद्या (सोमवार) ) संपूर्ण गांधीनगर बाजारपेठ बंद राहणार आहे. असा ठराव सिंधी सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष गुवालदास कट्यार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यापाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

गुरुनानक जयंतीनिमित्त सिंधी सेंट्रल पंचायत, प्रेम प्रकाश मंदिर आणि विविध मंदिरात ग्रंथ पठण, किर्तन, पूजाअर्चा असे विविध उपक्रम होणार आहेत. स्वामी शांती प्रकाश महाराज यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या  कार्तिक फेरीची  सांगता  होणार आहे. गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथाचे पूजनही सिंधी बांधवांच्या वतीने करण्यात येणार आहे.

या बैठकीला होलसेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेशलाल आहुजा, रिटेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप कुकरेजा, किराणा पंचायतचे अध्यक्ष सुनील पहुजा, व्यापारी संस्थांचे पदाधिकारी, सिंधी सेंट्रल पंचायतचे पदाधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते.