Published October 13, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर महानगरपालिकेचे मावळते आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली रद्द करण्यात यावी. अशी मागणी आज (मंगळवार) साहेबराव काशीद यांनी गांधीजींचा वेष परिधान करून केली. महापालिकेपासून जिल्हाधिकार्यालयांपर्यत त्यांनी पायी प्रवास करत शिष्टमंडळाच्या वतीने सदर मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले.

वेदनात म्हटले आहे की, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यापासून आजअखेर एकही सुट्टी न घेता काम केले आहे. तर महापुरासह कोरोना काळातील कलशेट्टी यांचे योगदान लाखमोलाचे आहे. त्यांनी कोल्हापूरला स्वच्छ सुंदर करण्याचे काम केल्यामुळे स्वच्छतादूत म्हणून कलशेट्टी यांना ओळखले जातात. अशातच अचानक त्यांची बदली झाल्याने सर्व स्तरातून बदलीच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे. तरी त्यांची बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी प्रविण पोवार, आचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप लाड, जावेद बागवान, मुस्लीम समाजाचे आष्पाक बागवान उपस्थित होते.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023