आळते येथे गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात संपन्न…

0
174

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील आळते येथे आज (शुक्रवार) गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी गजानन महाराजांचा अभिषेक, पुजा, नामस्मरण आणि  पुष्पवृष्टी करून श्रींची आरती करण्यात आली.

या सोहळ्यामध्ये महिलांनी मोठ्या भक्तीभावाने सर्व धार्मिक विधी पार पाडले. प्रत्येक वर्षी या सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. परंतु, कोरेनाच्या पार्श्वभूमीवर महाप्रसाद घेण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी केळी आणि लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.