हातकणंगले (प्रतिनिधी) : खुनी हल्ला करून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या रणजीत बाबुराव चव्हाण (वय ४१,रा. इंगळी ता. हातकणंगले) याला हातकणंगले पोलीसांनी काल (शनिवार) रात्री उशीरा अटक केली आहे. रणजीत चव्हाण हा गेल्या  दीड महिन्यापासून फरारी होता. याला पोलीसांनी रुई येथे अटक केली आहे.

गेल्या महिन्यात १२ जुलै रोजी हातकणंगले पोलीसात त्याच्या विरोधात फिर्याद दाखल झाली होती. तेव्हापासून तो फरारी होता. चव्हाण याचा  रुई परिसरात वावर असल्याचे खबऱ्या मार्फत पोलीसांना समजले. यावेळी हातकणंगले पोलिसांनी आरोपीचा मोबाईल ट्रेस करुन तो रुई येथे आढळल्याने त्याला अटक केली आहे.

ही कारवाई, हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदरशनाखाली पो. कॉ. यशवंत उपराटे, प्रकाश खराडे, सागर पोवार, सुहास गायकवाड, संग्राम पाटील, मंगेश लोहार आदींनी केली.