मौजे वडगावच्या सर्वांगीण विकासासाठी ‘गेल इंडिया’ तत्पर : पी. मुरूगेसन

0
159

टोप (प्रतिनिधी) :  मौजे वडगावच्या  शैक्षणिक,  वैद्यकीयसह सर्वांगीण विकासासाठी गेल इंडिया कंपनी नेहमी तत्पर राहील, अशी ग्वाही गेल इंडिया कंपनीचे कार्यकारी निर्देशक पी. मुरूगेसन यांनी आज (शुक्रवार) दिली. मौजे वडगाव येथील पाझर तलाव रस्त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी  ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच काशिनाथ कांबळे होते.

मुरूगेसन पुढे म्हणाले की, मौजे वडगावने गेल इंडिया कंपनीवर विश्वास ठेवून कंपनीच्या प्रोजेक्टसाठी जागा उपलब्ध करून दिली  आहे. कंपनीच्या सीएसआर फंडातून गाव ते पाझर तलाव रस्त्यासाठी ३ कोटी १७ लाखांचा निधी देण्यात आला आहे.

तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महेंद्र कांबरे म्हणाले की, गेल इंडिया कंपनीने रस्ता करण्यासाठी कोटींचा निधी वर्षभरापूर्वी जिल्हा परिषदेला वर्ग केला. पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो वेळेत उपलब्ध  झाला नाही. त्यासाठी गावकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर हा निधी मिळविण्यात यश आले.

यावेळी पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत, गेल इंडिया कंपनीचे जनरल मँनेजर  ए. अनबर्सन,  चीफ मँनेजर (मार्केटिंग)   वासनिक,  डेप्युटी जनरल मँनेजर टी. राजकुमार,  चीफ मँनेजर मनोहरज जोशी,  सिनियर मँनेजर राजेंद्र नारनवरे,  पंचायत समिती सदस्या डॉ. सोनाली पाटील,  उपसरपंच सुभाष अकिवाटे,  किरण चौगुले, विजय मगदूम,  माणसिंग रजपुत,  उदय चौगुले  आदी उपस्थित होते.

राजू थोरवत यांनी आभार मानले.