गडहिंग्लजकरांचे फुटबॉल प्रेम कौतुकास्पद : ना. हसन मुश्रीफ    

0
29

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजकरांचे फुटबॉलवरील प्रेम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. विनर्स एफसीने इतक्या मोठ्या पद्धतीने स्पर्धा घेतली आहे. तसेच आपण गडहिंग्लज फुटबॉलसाठी आणि नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. तर गडहिंग्लजकरांचे फुटबॉलवर असलेले प्रेम हे समोर असलेल्या प्रेक्षकांवरुन दर्शवत असल्याचे ना. मुश्रीफ म्हणाले.   

गडहिंग्लजमध्ये विनर्स एफसीने फुटबॉल स्पर्धा- २०२१ ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी दोन लाखांची पारितोषिके असून कोल्हापुरसह इतर राज्यातील नामवंत संघाचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ना. मुश्रीफ यांच्या हस्ते फुटबॉलला किक मारून करण्यात आले.

यावेळी जि.प. सदस्य युवराज पाटील, सोमगोंडा आरबोळे, अनिल कुराडे, बसवराज आजरी, महेश सलवादे, अमर मांगले, उदय परिट, गुंडया पाटील, प्रशांत शिंदे, महेश देवगोंडा, मलिक आरबोळे, विनायक काळगे, रोहित चव्हाण, प्रकाश नांद्रे आदी प्रमुख उपस्थित होते.