गडहिंग्लजला मुसळधार पावसाने झोडपले… (व्हिडिओ)

0
259

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : वातावरणात झालेल्या बदलाने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दररोज पाऊस पडत आहे. आज (शुक्रवार) संध्याकाळीही गडहिंग्लजमध्ये त्याचेच प्रत्यंतर आले. मुसळधार पावसाने शहराला चांगलेच झोडपले. यामुळे आबालवृद्ध नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.

सध्या उसतोडणीचा हंगाम सुरू असून या हंगामाला पावसाचा मोठा फटका बसणार आहे. अनेक ठिकाणी काजू, आंब्याच्या झाडांना आलेला मोहर गळून पडला आहे. यामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. एकूणच या अवकाळी पावसाने बळीराजाचे मोठे नुकसान होणार आहे.