‘गडहिंग्लज’ला संततधार; चंदगडचा जिल्ह्याशी संपर्क तुटला…

0
207

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : दोन दिवसांपासून सुरू असलेली गडहिंग्लज परिसरातील संततधार आज (गुरुवार) रात्रीपासून आणखी वाढली असून हिरण्यकेशी पुन्हा एकदा पात्राबाहेर पडली आहे. निलजी, ऐनापूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील भडगांव पूल पाण्याखाली गेल्यामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आली आहे.

तालुक्यात आज ३४०मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत ४११९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. यावेळी ‘हिरण्यकेशी’ दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली असून सकाळीच ऐनापूर, निलजी, खणदाळ येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर भडगांव पुलावर पाणी आल्यामुळे गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर संभाव्य पूरस्थितीबाबत प्रशासन दक्ष असून नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.