गडहिंग्लज शिवसेना शहरप्रमुखपदी गडकरी की क्षीरसागर..?

0
92

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  गडहिंग्लज शिवसेना शहरप्रमुख पदाची माळ गडकरी की क्षीरसागर यापैकी कोणाच्या गळ्यात पडणार ?  याबाबत शिवसैनिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.  सध्या शहर प्रमुख पद रिक्त असून या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

काशिनाथ गडकरी सध्या शिवसेनेत उपशहर प्रमुख पदावर कार्यरत आहेत. त्यांनी शहरातील विविध प्रश्नांवर आवाज उठवून सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तर प्रतीक क्षीरसागर युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत. त्यांनीही युवासेनेच्या माध्यमातून शहरातील अनेक प्रश्न शासन दरबारी मांडून पाठपुरावा सुरू केला आहे.  सध्या जिल्ह्यात गोकुळ,  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. तर काही महिन्यांवर  गडहिंग्लज नगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर शहर प्रमुख पदाची निवड महत्वाची ठरणार आहे.  शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे या पदावर कोणाची निवड करणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.