गडहिंग्लज (प्रतिनिधी)  :  भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून देण्यात येणारा राज्यस्तरावरील ‘दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार’  गडहिंग्लज पंचायत समितीला प्राप्त झाला. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातून १ जिल्हा परिषद,  २ पंचायत समिती आणि १४ ग्रामपंचायती निवडण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत सातारा तर ग्रामपंचायतीमधून १४ गावामध्ये कागल तालुक्यातील तमनाकवाडा या गावाची निवड झाली आहे.

‘यशवंत पंचायत राज’सह अनेक पुरस्कार मिळवत गडहिंग्लज पंचायत समितीने सातत्यपूर्ण गौरवास्पद वाटचाल सुरू ठेवली आहे. पंचायत समिती पदाधिकारी, सदस्य आणि कर्मचारी यांच्यात सुयोग्य ताळमेळ साधत गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा यश प्राप्त झाले असून हा पुरस्कार म्हणजे सर्वांच्या चांगल्या कार्याची पोचपावती ठरला आहे. याबाबत समाजातील सर्व स्तरातून गडहिंग्लज पंचायत समितीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.