गडहिंग्लज बाजारपेठेत ‘मार्गशीर्ष गुरुवार’निमित्त खरेदीसाठी गर्दी

0
208

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि व्रत-वैकल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीनंतर वेध लागतात ते मार्गशीर्ष महिन्याचे. श्रावण महिन्याइतकेच महत्व मार्गशीर्ष महिन्याला आहे. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी समस्त महिला वर्ग लक्ष्मी देवीची आरास करून पूजा करतात. त्याची सुरवात उद्या (गुरूवार) पासून होत आहे.

आज (बुधवार) गडहिंग्लजच्या बाजारात लक्ष्मीपूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळाली. यामध्ये पाच फळे, खाऊची पाने, गजरा, कमळ इत्यादींची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. बाजारात पाच फळांचा दर हा ३० ते ४० रुपये, खाऊची पाने १० रुपयाला ५, तर केळी दर ४० रुपये डझन असा होता.