ग्रा.पं. निवडणूक : गडहिंग्लजमध्ये मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

0
260

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  गडहिंग्लज तालुक्यातील ५० पैकी ४४ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी  (दि.१५) मतदान पार पडले.  आता सोमवारी (दि. १८) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गांधीनगर येथील पॅव्हेलियन हॉल येथे सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली असून यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

तालुक्यातील ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तालुक्यात मोठ्या चुरशीने ८०.११ टक्के इतके मतदान झाले होते.  आता या वाढीव मतदानाचा कुणाला लाभ होतो.  गावचा कारभारी कोण ?  हे उद्याच स्पष्ट होणार आहे. पॅव्हेलियन हॉल येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी नागरिकांची गर्दी रोखण्यासाठी पोलिसांनी नियोजन केले आहे.