गडहिंग्लज सायकल क्लब, नगरपरिषदेच्या वतीने सायकल रॅली…

0
162

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत हरित  संकल्पासाठी गडहिंग्लज नगरपरिषद आणि गडहिंग्लज सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आज (शुक्रवार) आयोजन केले होते. या रॅलीची सुरुवात गडहिंग्लज नगरपरिषदेच्या प्रांगणातून करण्यात आली.

या सायकल रँलीचा शुभारंभ गडहिंग्लज नगरपरिषदेचे  मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी केला. यामध्ये गडहिंग्लज नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, गडहिंग्लज सायकल क्लबचे सर्व मेंबर्स उपस्थित होते. ही सायकल रॅलीमधून पूर्ण गडहिंग्लज शहरामध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी वि.दि.शिंदे विद्यालय, साधना हायस्कूल,स्वामी विवेकानंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, जागृती हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी वसुंधरा रक्षणाची शपथ घेतली. तर स्वामी विवेकानंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे गडहिंग्लज नगरपरिषद आणि शाळेच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले.