गडहिंग्लज बंदला प्रतिसाद

0
239

गडहिंग्लज (प्रतिनिधी): अन्यायकारक जीएसटी रद्द करा, या मागणीसाठी गडहिंग्लज चेंबर ऑफ कॉमर्स कडून शहर बंद
करण्यात आले. जीएसटी ही केंद्र सरकारची करप्रणाली पूर्णपणे व्यापाऱ्यांवर अन्याय करणारी असून या मुळे रोजच्या व्यवहारात गोंधळ निर्माण होत आहे. तसेच मागील चार वर्षात यामध्ये सरकारने ९५० वेळा बदल केला असून कोणत्याही व्यापारी संघटनेला विश्वासात घेतले गेले नाही.

केंद्र सरकार मनमानी पद्धतीने कारभार करीत आहे. जीएसटीचा हिेशोब देण्यातच अनेक व्यापाऱ्यांचा वेळ वाया जात आहे. या कर प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात यावी, जाचक अटी रद्द करण्यात याव्यात आदी मागण्या बंदवेळी करण्यात आले. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाकडून प्रांत कार्यालतील नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या वेळी शहरातील विविध व्यापारी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंदला पाठिंबा दिला. शहरातील सर्व दुकादारांनी या बंदला प्रतिसाद दिला.