ग्रा.पं.निवडणूक : यड्रावमध्ये दुरंगी लढत   

0
319

इचलकरंजी (प्रतिनिधी) : : शिरोळ तालुक्याचे प्रवेशद्वार मानल्या गेलेल्या आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांचे गाव असलेल्या यड्राव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दुरंगी लढत होणार आहे. सोमवारी अर्ज माघारीनंतर यड्रावमधील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या विरुद्ध यड्रावकर गट, सतेंद्रराजे गट, शिवसेना आणि शेतकरी संघटना अशी लढत होणार आहे. शेतकरी संघटनेने बिनशर्त पाठिबा दिला आहे. तर शिवसेनेला दोन ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे. एकूणच भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत यड्रावमध्ये रंगणार आहे.

दरम्यान, सध्या जि.प. सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर यांची ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आहे.