ग्रा.पं.निवडणूक : महेतील पॅनेल प्रमुखच बिनविरोध   

0
382

सावरवाडी : (प्रतिनिधी) महे (ता.करवीर) ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होत असताना स्थानिक आघाडीचे प्रमुख सज्जन तुकाराम पाटील हे प्रभाग क्रमांक २ मधून बिनविरोध निवडून आले आहेत. 

सज्जन पाटील राजीवजी सूत गिरणीचे संचालक व गावातील भैरवनाथ सहकारी विकास सेवा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. शिवाय आमदार पी.एन.पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. ग्रामपंचायतीच्या एकूण ११ जागेसाठी २१ उमेद्वार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेस पक्षाच्या स्थानिक दोन आघाडीतच दुरंगी लढत होत आहे. त्यामुळे येथे अतितटीची लढत पाहायला मिळणार आहे.