राजमाता जिजाऊंचा आदर्श भावी पिढीने घ्यावा : राजेश क्षीरसागर

0
68

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजमाता जिजाऊ या छ. शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत राज्याचा कारभार बघत न्यायनिवाडा करीत होत्या. तो काळ विचारात घेतला तर प्रखर परिवर्तनवादी आणि रंजल्या गांजल्याच्या पालनकर्त्या होत्या. अशा या राजामातेचा आदर्श भावी पिढीनेही घ्यावा. असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.

छ. शिवाजी महाराजांना त्यांच्या बालपणातच स्वराज्याचे धडे शिकविणाऱ्या रणरागिणी राजामाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त राजमाता तरूण मंडळ, कोल्हापूर यांच्या वतीने के.एम.सी. कॉलेज परिसरातील स्मारकास अभिवादन करण्यात आले. यावेळी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या स्मारकाचे सुशोभीकरण राजेश क्षीरसागर यांनी पूर्ण केले आहे. यावेळी राजेश क्षीरसागर यांनी, युग प्रवर्तक छ. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना घडविणाऱ्या आदर्श राजमाता जिजाऊ समस्त महाराष्ट्राच्या दैवत आहेत. राजमाता जिजाऊ यांना जयंती निमित्त मानाचा मुजरा, असे प्रतिपादन राजेश क्षीरसागर यांनी केले.

यावेळी आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, उपायुक्त नितीन मोरे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, राजमाता तरूण मंडळाचे धनाजी आमते, राहुल केर्लेकर, रोहित महाडिक, निलेश आमते, युवराज पाटील, श्रीकांत लाड, विश्वास वगदे, निवास केर्लेकर, प्रतिक नलवडे, रोहन चव्हाण, संतोष लाड आदी उपस्थित होते.