क्षारपड जमिनीच्या सुधारणा योजनांसाठी यापुढेही सहकार्य : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

0
15

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यामध्ये क्षारपड जमिनीचे प्रमाण मोठे आहे. या सर्व जमिनी पिकाखाली आणण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने सुधारणा करणे काळाची गरज आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी क्षारपड जमीन सुधारणा योजनांचे काम सुरू आहे. अशा योजना राबवणाऱ्यांना यापुढेही सहकार्य राहणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

हेरवाड येथे राजेंद्र पाटील-यड्रावकर क्षारपड जमिन सुधारणा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ७०० एकर क्षारपड जमीन सुधारणा कामाचा शुभारंभ राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर क्षारपड जमिन सुधारणा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून शिरटी, हेरवाड, बुबनाळ आदी गावातील हजारो एकर शेती क्षारपडमुक्त करण्यात आली आहे.

यावेळी पं. स. सदस्य मिनाज जमादार, प्रोजेक्ट इंजिनिअर सुभाष कृष्णाळे, आर. बी. पाटील, सरपंच सुरगोंडा पाटील, रावसाहेब पाटील- चिपरीकर, उपाध्यक्ष जमीर मुल्ला, बाबासाहेब नदाफ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वसंत पुदाले, जकेंद्र पाटील, राजेंद्र खुरपे, संजय चौगुले, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.