कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार व यशस्वी उद्योजक आमदार चंद्रकांत जाधव यांचे हैदराबाद येथे दुःखद निधन झाले. हैदराबादमधून त्यांचे पार्थिव दुपारी एक वाजेपर्यंत काँग्रेस कमिटी कार्यालय येथे आणण्यात येणार आहे. दुपारी १.०० ते १.३० वाजेपर्यंत काँग्रेस कमिटीत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सम्राटनगर येथील घरी पार्थिव नेण्यात येणार आहे. दुपारी १.३० ते ३.०० वाजेपर्यंत पार्थिव सम्राटनगर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

दुपारी तीन वाजता घरातून अंत्ययात्रा सुरू होईल. ती कोल्हापूर उद्यम सोसायटी, जाधव आयर्न वर्क्स, हुतात्मा पार्क, पीटीएम तालीम, कैलासगडची स्वारी मंदिर, मंगळवार पेठेत येथील आमदार चंद्रकांत जाधव यांचे जनसंपर्क कार्यालय, बालगोपाल तालीम मंडळ, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी मार्गे पंचगंगा स्मशानभूमीकडे मार्गस्थ होईल.