कुंभोज चर्च सभागृहासाठी २० लाखाचा निधी – आ. राजू आवळे

0
152

कुंभोज (प्रतिनीधी) : कुंभोज तालुका हातकलंगले  येथील चर्च परिसरातील जूने व प्रसिद्ध चर्च म्हणून परिचित आहे. या चर्चच्या ९३ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू बाबा आवळे यांनी उपस्थिती दाखवली, चर्चच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ५० निराधार लोकांना निराधार योजना लाभार्थीचे आदेश वाटप केले. त्याचप्रमाणे चर्चला लागणाऱ्या सभामंडप हॉलसाठी २० लाखांचा निधी देण्याची घोषणा यावेळी केली.

कुंभोज येथे चर्चेच्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधव उपस्थित राहिले. सदर कार्यक्रमाच्या सदिच्छा भेटिवेळी आमदार राजू बाबा आवळे यांनी सदर चर्चेच्या सभागृह बांधकामासाठी २० लाख निधीची घोषणा केली. तसेच यावेळी कुंभोज गावातील पन्नास निराधार महिला व पुरुषांना निराधार योजनेच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी ख्रिस्ती समाजाच्या वतीने आमदार राजु बाबा आवळे यांचा सत्कार करण्यात आला.

कुंभोज मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल त्या प्रमाणात निधी दिला जाईल. तसेच शासन दरबारी प्रलंबित असणारे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे आश्वासन यावेळी आ. आवळे यांनी दिले. यावेळी महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, माजी उपसरपंच दावीद घाटगे, धनाजी तिवडे, सदाशिव महापुरे, जहांगीर हजरत, माजी सरपंच कमल सुवासे, आर के टेलर, पोलीस पाटील, मोहम्मद पठाण, मिलिंद घाटगे तसेच कुंभोज ग्रामस्थ व ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून असणारे ख्रिस्ती बांधवांची सभागृहाची  मागणी आ. आवळे यांनी तात्काळ मंजूर केल्याने ख्रिस्ती बांधवातून आनंदाचे वातावरण पसरले आहे.