खा. धैर्यशील माने यांच्या फंडातून नगरपालिकेला दीड कोटींचा निधी : अलका स्वामी    

0
88

इचलकरंजी (प्रतिनिधी) : खा. धैर्यशील माने यांनी इचलकरंजी पालिकेला एक कोटींचा निधी, शहापूर म्हसोबा मंदिर परिसर विकसित तसेच सुशोभीकरण करण्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर करून दिला आहे. अशी माहिती आज (शुक्रवार) नगराध्यक्ष अलका स्वामी, माजी बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे यांनी दिली.

यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेवराव गौड, शहरप्रमुख सयाजीराव चव्हाण, नगरसेवक रविंद्र माने, बांधकाम सभापती उदयसिंह पाटील, शिक्षण सभापती मनोज साळुंखे, महिला बालकल्याण सभापती सारिका पाटील, संध्या बनसोडे, नगरसेवक, शिक्षण अधिकारी उपस्थित होते.