मोबाईलवर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या फरारी गुन्हेगाराला अटक…

0
114

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूपुरी येथील मोबाईलवर ऑनलाईन जुगार सट्टा घेणाऱ्या फरारी झालेल्या आणखी एकास आज (रविवारी) शहर पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने अटक केली. वासिम युनूस नाखवा (रा. मंगळवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शाहूपुरी येथील पाचव्या गल्लीमध्ये राहुल बने हा मोबाईलद्वारे वेबसाईट तयार करून त्याच्या अन्य साथीदारांच्या मदतीने ऑनलाईन क्रिकेटचे बेटिंग, तीन पानी  जुगाराचा ऑनलाईन सट्टा घेत होते. याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावेळी शहर पोलिस उपाधीक्षकांच्या पथकाने २४ नोव्हेंबरला रात्री या ठिकाणी छापा टाकला होता. यावेळी मोबाईलवर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या राहुल बने याला अटक केली होती.

मात्र, त्याचे साथीदार गणेश योगेश काटे (रा. प्रतिभानगर), सलमान जमादार (रा. शाहूपुरी), ओंकार चौगले (रा. प्रतिभानगर), विकी मोरे (रा. शाहूपुरी), सुदर्शन किरोळकर (रा. टाकाळा) हे या प्रकरणात फरारी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.