कळंबा येथे प्रेमप्रकरणातून खुनाचा प्रयत्न करणारा फरारी आरोपी जेरबंद…

0
153

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर पोलीस ठाणे हद्दीमध्ये कळंबा तलाव परिसरामध्ये आज (शुक्रवार) प्रेमप्रकरणातून पिडीत मुलीवर खुनाचा प्रयत्न करून फरारी झालेल्या आरोपीला काही तासातच जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे. ऋषीकेश बाबुराव कोळी (वय ३१ रा. रामगदुम कॉलनी, पाचगाव, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चारचाकी गाडी क्रमांक (एमएच- ०९- बीएम- ३००७) आणि एअरगन, छरे जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलीस अंमलदार पो. हे कॉ. उत्तम सोडीलकर, पो. कॉ. सुरेश पाटील, वैभव पाटील यांनी केली.