इचलकरंजी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांच्या विरोधात आज (मंगळवार) शिवसेना इचलकरंजी शहराच्यावतीने मंत्री राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख महादेवराव गौड, तालुकाप्रमुख आनंद शेट्टी, शहरप्रमुख सयाजीराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहरकार्यालय येथून मोर्च्या काढण्यात आला. तसेच छ. शिवाजी महाराज पुतळा येथे नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी आक्रमक झालेले आंदोलक आणि पोलीसांमध्ये झटापटही झाली.

या आंदोलनात नगरसेवक रविंद्र माने, रवींद्र लोहार, मलकरी लवटे, महेश बोहरा, धनाजी मोरे, मंगल मुसळे, शोभा गोरे, मधुमती खराडे, मंगल लायकर, दत्ता साळोखे, लक्ष्मण पाटील, संतोष गौड आदी उपस्थित होते.