कोल्हापुरातील अजय, शिल्पाच्या डान्सचे ‘कलर्स’वर दिवाने… 

0
374

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजेंद्रनगरजवळच्या साळोखे पार्क,  भारतनगर झोपडपट्टी मध्ये राहणारे अजय फाळके आणि शिल्पा फाळके  हे दाम्पत्य नृत्य क्षेत्रात पारंगत…  अत्यंत कष्ट व गरिबीतून गेली २५ वर्ष रेकॉर्ड डान्स स्पर्धांच्या माध्यमातून ते आपला चरितार्थ  कसाबसा चालवत आहेत. या जोडीने कलर्स  या हिंदी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘डान्स दिवाने सिजन ३’  या रियालिटी शो मध्ये टीव्ही राउंड जिंकत आपले स्थान पक्के केले आहे.

या जोडीचा थक्क करणारा प्रवास खरोखरच  कोल्हापूरला अभिमान वाटेल असा आहे. त्यांचा नृत्याविष्कार पाहता नक्कीच ही जोडी या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत टिकून राहील, याबाबत शंका वाटत नाही. कोल्हापूरमधून पहिल्यांदाच अशा स्पर्धकांनी  रियालिटी शोमधील टॉप  पोझिशन मिळवली आहे. त्यांचा आजवरचा नृत्य प्रवास सर्वांना प्रोत्साहित करणारा असाच आहे. नृत्यक्षेत्राला हेवा वाटावा, असे यश अजय शिल्पाने  डान्स दिवानेमध्ये पदार्पणातच मिळवले आहे. या ‘रियालिटी शो’ मध्ये अजय शिल्पाची जोडी नक्कीच आपले कर्तृत्व दाखवेल. व कोल्हापूरच्या कला परंपरेच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवतील.  कोल्हापूरच्या या नृत्यजोडीला  पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा…!