पोलिसांचा धाक दाखवत लघुशंकेसाठी थांबलेल्या एकाला लुटले

0
62

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उमा टॉकीजजवळ लघुशंकेसाठी थांबलेल्या एका व्यक्तीचा एका अनोळखी इसमाने माझा मित्र पोलीस आहे, असा धाक दाखवत त्याच्याकडून १६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हातोहात लंपास केला. याप्रकरणी सत्यजित शिवाजीराव मुळीक (वय ४८, रा. राजारामपुरी १३ वी गल्ली) यांनी एका अनोळखी इसमा विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सत्यजित मुळीक लघुशंकेसाठी उमा टॉकीज येतील एका मुतारीत गेले होते.  त्यावेळी एक अनोळखी इसम मुतारी मध्ये येऊन त्यांना इथे काय करतोस असा जाब विचारत माझा मित्र पोलीस आहे. आता पोलिसांनाच बोलवतो तुला दाखवतोच, असे म्हणत मुळीक यांना मारहाण करून जबरदस्तीने त्यांच्या खिशातील १० हजारांची रोकड एक सॅमसंग कंपनीचा मोबाइल व मुळीक याची कागदपत्रे घेऊन त्या अनोळखी इसमाने मोटरसायकलवरून पलायन केले. याप्रकरणी सत्यजित मुळीक यांनी त्या अनोळखी इसमाविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.