गडहिंग्लज येथे शुक्रवारी ना. हसन मुश्रीफ यांचा सत्कार…

0
124

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  शासनाच्या विविध विकास कामांच्या योजनामधून ११ कोटी ५४ लाख रुपये, गडहिंग्लज शहराची वाढीव हद्द, शहरातील विविध विकास कामे ना.हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले. त्या कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे.

ना.मुश्रीफ यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आता गडहिंग्लज शहराचा सर्वांगीण विकास होणार आहे. त्यामुळे शुक्रवार (दि. ८) रोजी सायंकाळी ६ वाजता गडहिंग्लज नगरपरिषद येथे गडहिंग्लज शहर महाविकास आघाडी आणि नागरिकांच्या वतीने ना. हसन मुश्रीफ यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती  महाविकास आघाडीने एका पत्रकाद्वारे दिली आहे.