कळे (प्रतिनिधी) : वाघुर्डे, ता. पन्हाळा येथे कुंभी धामणी सामाजिक आरोग्य शैक्षणिक संस्था व युवा सेना पन्हाळा तालुका उपप्रमुख कृष्णात शिखरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे नरहरी मंदिरामध्ये आयोजन करण्यात आले होते. याचा परिसरातील १०० नागरिकांनी लाभ घेतला.

या शिबिराचे उद्घाटन सरपंच अनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. लायन्स हॉस्पिटल, सांगलीमार्फत १०० नागरिकांची नेत्रतपासणी, औषधोपचार करून मार्गदर्शन करण्यात आले. त्यापैकी २५ मोतीबिंदू रुग्णांना पुढील उपचाराकरिता लायन्स हॉस्पिटलला पाठविण्यात आले.

आतापर्यंत कृष्णात शिखरे यांनी वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम राबविले आहेत. या शिबिरास हर्षल सुर्वे, डॉ. अजित पाटील, अरुण पाटील, प्रदीप हंडे, जयराम पोवार, अमित नवलव, प्रकाश कांबळे, रुपाली नाईक, नरसिंह ग्रुप व ग्रामस्थ उपस्थित होते.