प्रफुल्ल महाजन यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरात ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’चा मोफत प्रयोग…

0
100

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा कोल्हापूर यांच्या वतीने ख्यातनाम नाट्यवितरक आणि नाट्य व्यवस्थापक कै.प्रफुल्ल महाजन यांच्या स्मृतिदिनानिमित्त वऱ्हाड निघालयं लंडनला’ नाट्यप्रयोग रविवार (दि.२४) जानेवारी रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात दु. ४ वा.सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री सतेज पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत.

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या वतीने हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून याची प्रवेशिका २२ जानेवारीपासून सकाळी ९ ते १२ आणि दु.४ ते ८ या वेळेत नाट्यगृहावर उपलब्ध असणार आहे. संदीप पाठक यांची भूमिका असणाऱ्या  वऱ्हाड निघालयं लंडनला या नाट्यप्रयोगाचा लाभ नाट्यरसिकांनी घ्यावा असे आवाहन अ.भा.नाट्यपरिषदेच्या वतीने अध्यक्ष आनंद कुलकर्णी, उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, प्रमुख कार्यवाह गिरीश महाजन, सह.कार्यवाह जयश्री नरके,कोषाध्यक्ष डॉ. शशिकांत चौधरी यांनी केले आहे.