यड्रावमध्ये पार्वती इंडस्ट्रियलच्या वतीने मोफत कोव्हिड तपासणी शिबीर…

0
31

यड्राव (प्रतिनिधी) : पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत कोव्हिड तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. वसाहतीमधील उद्योजक, कामगार, कर्मचारी यांची कोव्हिड तपासणी करण्यात आली. आदित्य राजेंद्र पाटील-यड्रावकर प्रमुख उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसाहतीमधील उद्योजक, कामगार, कर्मचाऱ्यांची  आज (मंगळवार) वसाहतीच्या प्रशासनाने शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामधून वसाहतीमधील अनेक उद्योजक, कामगार, कर्मचाऱ्यांनी कोव्हिडची तपासणी करून घेतली.

यावेळी पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेटचे व्हाईस चेअरमन महावीर खवाटे, संचालक बाळासाहेब केटकाळे, यड्रावचे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर, मुख्य कार्यकारी संचालक अभिजीत पाटील, यड्रावचे तलाठी नितीन कांबळे, ग्रामसेवक विष्णू गावडे आदी उपस्थित होते.