कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज (मंगळवार) नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महापूजा ओमकाररुपिणी स्वरुपात बांधण्यात आली.

चतुर्थीला श्री अंबाबाई सहस्त्र नामस्रोत उद्धृत होणार आहे. या सहस्त्रनामाची पार्श्वभूमी अशी – मार्कंडेय ऋषी आणि नारद मुनी यांच्या संवादातून सनतकुमारांनी सांगितलेल्या महालक्ष्मी सहस्त्रनामाचे विवेचन केले आहे.  सनतकुमार योगीजनांना महालक्ष्मीची हजार नावे सांगतात.

ही पूजा मकरंद मुनीश्वर आणि माधव मुनीश्वर यांनी बांधली.