मस्करी केल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत चार जखमी

0
35

कोल्हापूर  ( प्रतिनिधी) : विचारे माळ येथे चेष्टा-मस्करी केल्याच्या कारणातून दोन कुटुंबात झालेल्या मारहाणीत चौघेजण जखमी झाले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बाबासो कांबळे यांनी राजू पन्हाळकर यांच्या नातेवाईकांचे मस्करी केली. या रागातून कांबळे आणि पन्हाळकर या दोन कुटुंबीयांमध्ये मारामारी झाली. यात ललिता कांबळे, तुषार कांबळे, ओकार कांबळे, शरद फुटाणे हे चौघेजण जखमी झाले.

या प्रकरणी ललिता बाबासो कांबळे (वय ३७, रा. विचारे माळ) यांनी राजू जगन्नाथ पन्हाळकर, पुष्पक विश्वास थोरात, शुभम शरद फुटाणे आणि अजिंक्य सुतार (सर्व रा. पन्हाळकर गल्ली, विचारे माळ) या चौघांविरुद्ध तर शरद अरविंद फुटाणे (वय ४५, रा. पन्हाळकर गल्ली, विचारे माळ) यांनी बाबासो वसंत कांबळे, तुषार बाबासो कांबळे, ओंकार बाबासो कांबळे व प्रकाश वसंत कांबळे  (सर्व रा. पन्हाळकर गल्ली, विचारे माळ) या चौघांविरुद्ध अशा परस्परविरोधी फिर्यादी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here