प्रियंका गांधी यांच्या ताफ्यातील ४ वाहनांची धडक  

0
100

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमधील रामपूरच्या दौऱ्यावर गेलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांच्या  वाहनांच्या ताफ्याला अपघात झाला. प्रियंका यांच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांना धडकल्या. हा अपघात हापुड महामार्गावर गढमुक्तेश्वरजवळ झाला.  सुदैवाने या अपघातामध्ये प्रियंका  यांना कोणतेही दुखापत झाली नाही.  

प्रियंका गांधी यांच्या ताफ्यातील गाड्या रामपूरच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यावेळी अचानक प्रियंका गांधी यांची गाडी तापल्याने बोनेटमधून धूर येऊ लागला. त्यामुळे  चालकाने अचानक ब्रेक दाबून गाडी थांबवली. गाडी अचानक थांबल्याने ताफ्यामध्ये मागून येणाऱ्या गाड्यांनी प्रियंका बसलेल्या गाडीला धडक दिली. ताफ्यामधील चार गाड्या एकमेकांना आदळल्या.