सातारा बस स्थानकात चार शिवशाही बसेस आगीत जळून खाक…

0
185

सातारा (प्रतिनिधी) : सातारा बस स्थानकात आज (बुधवार) शिवशाही बसला आग लागली आहे. यामध्ये चारहून अधिक शिवशाही बसेस आगीत खाक झाल्या आहेत. एका बसला आग लागल्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या बसेसनेही पेट घेतला. या आगीत डेपोतील शिवशाही बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यावेळी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एका बसला आग लागल्यानंतर ही आग पसरली. आणि बाजूला उभ्या असलेल्या बसनंही पेट घेतला. ज्या व्यक्तीमुळे ही आग लागली त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.