मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटातील चार फरार आरोपींना अटक…

0
26

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात गुजरात एटीएसने मोठी कारवाई केली आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपींच्या गुजरात एटीएसने मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेले सर्व चारही आरोपी हे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे हस्तक असल्याचे समोर आले आहे.गुजरात एटीएसने अबू बकर, युसुफ भटाका, शोएब बाबा आणि सैय्यद कुरेशी या चौघांना अटक केली आहे. या सर्व आरोपींना अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे.