पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या चंदगडमधील चौघांचा अपघातात मृत्यू

0
918

पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर – सांगोला रस्त्यावर कासेगांवाजवळ थांबलेल्या ट्रकला बोलेरो  गाडीने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात  (कोदाळी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर )   येथील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला.  तर एकजण गंभीर जखमी आहे.  हा अपघात आज (शुक्रवारी) सकाळी सहाच्या सुमारास झाला.

कोदाळी येथून हे सर्वजण पंढरपूरला दर्शनासाठी निघाले होते. या अपघातात १ पुरूष, २ महिला आणि १ मुलगी यांचा मृत्यू झाला आहे. तर धोंडीराम सखाराम धनगर (रा.कोदाळी, ता. चंदगड, कोल्हापूर) असे यातील एका मयताचे नांव आहे. तर इतर मयतांची आणि जखमींची ओळख  पटविण्याचे काम सुरू आहे. जखमींना उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले आहे.