टोप (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिरोली येथे चार दिवसांचा जनता कर्फ्यु करण्याचा निर्णय ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन, दक्षता कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. दि. ६ मे ते ९ मे पर्यंत हा जनता कर्फ्यू करण्यात येणार आहे.

शिरोली गावातील व्यापारी,  ट्रान्सपोर्ट,  दुकाने, हॉटेल सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. तर अत्यावश्यक सेवेमधील मेडिकल्स सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ६ ते ९ या वेळेत चालू रहणार आहेत. तसेच  शेतकऱ्यांना सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंतची मुभा देण्यात आली आहे. गावातील प्रत्येक वार्डात टास्क फोर्स कमिटी स्थापन करण्यात आली असून या कमिटीने आपल्या वार्डात गस्त घालून जनता कर्फ्यूची अंमलबजाणी करणार आहेत. हा कर्फ्युचे नियम मोडणाऱ्याला ही कमिटी कारवाई करणार आहे.

तसेच शिरोली गावातील सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन शिरोलीचे सरपंच आणि दक्षता कमिटीचे अध्यक्ष शशिकांत खवरे यांनी केले. तर जनता कर्फ्यूच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे पोलीस अधिकारी किरण भोसले यांनी केले.

यावेळी बैठकीसाठी विठ्ठल पाटील, ग्रा.पं. सदस्य प्रकाश कौंदाडे, तंटामुक्ती सतिश पाटील, बाजीराव सातपुते, सरदार मुल्ला, संदीप कांबळे, राजु येसुगडे, विष्णुकांत भोसले, जोतीराम पोर्लेकर, उत्तम पाटील, अर्जुन चौगुले, ग्रामविकास अधिकारी भोगम उपस्थित होते.