कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांना उद्यापासून (शुक्रवार) सलग चार दिवस सुट्टी देण्यात आली आहे. शनिवार दि. १४ ते १६ दिवाळीची सुटी जाहीर करण्यात आली आहेच. त्यातही आता शुक्रवारची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याने शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात काम असणाऱ्यांना मंगळवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दिवाळीला सुरुवात झाली आहे. कोरोना आजाराचे संकट असले, तरी दिवाळीची धामधूम जोरात सुरू आहे. यंदा दिवाळीत शनिवार, रविवार, सोमवार आला आहे. याच्या सुट्ट्यांचा फायदा शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना होणार आहे. या तीन सुट्ट्यांना जोडूनच शुक्रवारची स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे सलग चार दिवस शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. मात्र, शुक्रवारपासून तीन दिवस ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्ह्यात दौरा आहे. त्यांच्या दौऱ्यांच्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहावे लागणार आहे.