राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले : पुराचा धोका कायम

0
617

राशिवडे (प्रतिनिधी) : महापुराच्या आस्मानी संकटातही सर्व कोल्हापूरकरांच लक्ष्य राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडतात कधी आणि किती याकडे लागून राहिले होते. आज दिं. 25 रोजी 3.55 वाजलेपासून सात वाजेपर्यंत सात दरवाज्यापैकी पाच दरवाजे उघडले आहेत. जरी  पावसाने उघडीप दिली असली तरी पुराचा धोका मात्र कायम आहे. यामुळे पाणीपातळी उतरण्यास वेळ लागणार.

जिल्ह्यात सर्वत्र पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. यामुळे पाणी झपाट्याने उतरत आहे. आज दिवसभरात राधानगरी धरण क्षेत्रात फक्त 25 मिली. पावसाची नोंद झाली. सकाळपासूनच सर्वत्र दरवाजे उघडणार कधी ? उघडलेत का? याविषयी विचारणा होत होती. महापुराच्या अस्मानी संकटात ही राधानगरी चे स्वयंचलित दरवाजे लोकांच्या कुतूहलाचा विषय आहे. एकदा का हे दरवाजे उघडले की सर्वांनाच हायस वाटतं. पण पण आजच्या या चार दरवाज्यांच्या उघडन्यामुळे होणाऱ्या वीसर्गाचा परिणाम पुरावर होणार असे दिसते. महापूर ओसरत असतानाच पुन्हा एकदा या वीसर्गामुळे पाणीपातळी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.