दहशत माजविण्यासाठी जाणाऱ्या चौघांना अटक

0
80

इचलकरंजी (प्रतिनिधी) : धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविण्यासाठी जात असल्याच्या कारणावरून इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. फिरोज मकबूल मुल्ला (वय २९), राजेंद्र तुकाराम पाटील (वय ३८), दिलीप राजाराम शेळके (वय ३२, तिघे रा. कोरोची) व अभिमन्यू मुरलीधार पारीक (२९, रा. इंदिरा हौसिंग सोसायटी, जवाहरनगर) अशी त्यांची नावे आहेत.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडील गस्ती पथकाला आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारास स्टेशन रोडवरील कल्पवृक्ष हॉस्पिटलनजीक रस्त्यावर एक टाटा सुमो गाडी (एमएच ०४ सीडी ५२३७)  ही संशयितरित्या थांबली असल्याची दिसली. पोलिसांनी त्यांना हटकून या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये गुप्ती मिळून आली. चौकशीवेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दहशत माजविण्याच्या उद्देशाने चौघेजण जात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करून सुमो गाडी व गुप्ती जप्त करण्यात आली. यापैकी राजेंद्र पाटील व फिरोज मुल्ला हे दोघेही पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, उपनिरीक्षक प्रमोद मगर, गजानन पाटील, प्रशांत ओतारी व प्रकाश कांबळे यांच्या पथकाने केली.