हिटणीचे माजी सरपंच समशेर खलिफ यांचे निधन…

0
145

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील हिटणी येथील जनता पक्षाचे  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सरपंच समशेर खलिफ यांचे आज (मंगळवार) निधन झाले. समशेर खलिफ हे पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते होते.

माजी आमदार श्रीपतराव शिंदे आणि गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष भिकाजीराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा सामाजिक कार्यात सहभाग असायचा. १९८३ मध्ये हिटनीमध्ये महापूर आला होता यावेळी समशेर खलिफ सरपंच होते. संपूर्ण गावात त्यावेळी नदीचे पाणी शिरले होते. त्यांनी गावकऱ्यांना केलेली मदत अविस्मरणीय अशीच आहे. अनेकांना त्यांनी शासकीय मदत मिळवून दिली होती. त्यांच्या निधनाने एका जुन्या सामाजिक कार्यकर्त्याला जनता दल मुकला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.