‘आरएसएस’चे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे निधन

0
86

नागपूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते, ज्येष्ठ विचारवंत, तरुण भारतचे माजी संपादक  मा. गो. वैद्य यांचे आज (शनिवार) दुपारी अल्पशा निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले, तीन मुली, नातेवाईक असा मोठा परिवार आहे. नागपूर येथील अंबाझरी घाटावर उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.