माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बंधूंचा काँग्रेसला रामराम

0
74

अमृतसर (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे बंधू एस.एस. कोहली यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली आहे. त्यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला असून त्यांच्यासोबत काँग्रेस मजदूर विभागाचे अध्यक्ष साहिब सिंग, माजी बँक पदाधिकारी जे.एस.बिंद्रा,  तरसेम सिंग रानीके, मंजीत सिंह वडाली बूटा सिंग, संगतपुरा, निशान सिंग ग्रिडिंग, मजार सिंग, मणी ब्लू सिटीचे राजकुमार अणि कन्हैया या नेत्यांनीही आपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे  पंजाब काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

अमृतसरचे माजी महापौर ओम प्रकाश गब्बर यांनी देखील आपमध्ये प्रवेश केला आहे. ओम प्रकाश गब्बर सर्वप्रथम अकाली दलाचे नगरसेवक होते. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गब्बर हे वाल्मिकी धूना साहिब मॅनेजमेंट ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. दरम्यान,  गुजरातमधील सुरत येथील  महापालिका निवडणुकीत आपने १५  जागा जिंकल्या आहेत. आप हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याने या पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढू लागली आहे.