माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी श्री अंबाबाईला घातले साकडे…

0
252

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ना. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री कारकीर्दीतील अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे. यासाठी आज (रविवार) सकाळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि कोल्हापूर शिवसैनिकांच्यावतीने श्री अंबाबाईला महाभिषेक आणि साकडे घालण्यात आले.

यावेळी पुढील अडीच वर्षे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप युतीचे स्थिर सरकार महाराष्ट्राला लाभू दे. शिंदे सरकारच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याची मोठ्या प्रमाणात भरभराट आणि विकास होवू दे. शिवसेना-भाजप युतीचे सरकार अखंडित राहू दे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लोककल्याणाचे निर्णय होवू देत. मुख्यमंत्री म्हणून शिंदे अखंडीत पुढील दहा वर्षे राहू देत. त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू दे. असे साकडे राजेश क्षीरसागर आणि शिवसैनिकांनी घातले.