सांगली (प्रतिनिधी) :  बिजली मल्ल आणि सांगलीचे माजी आमदार संभाजीराव पवार (आप्पा) यांचे आज ( सोमवार) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.  त्यांची दुपारी १२ वाजता अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे सांगली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

मागील अनेक वर्षापासून ते पार्किसन्स या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु त्यांनी कोरोनावर मात केली होती.

दरम्यान, त्यांनी २००९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा मोठा परिवार आहे.